नवीन बातम्या
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा


4kNews कामोठे दि. 13  मुबंई प्रतिनिधी अजित मोहिते
छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक मा. अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी ७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील मागील दोन महिन्यांतील जनजागृती, आंदोलनात्मक तसेच संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


यावेळी अभिजीत दिपके यांनी मुंबईकर कॉक्रोचेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करून सुरू असलेला संघर्ष आणि जनजागृतीचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले. कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आदित्य शिंदे यांनीही मार्गदर्शन करताना संघटन विस्तार, कार्यपद्धती, जनआंदोलनांची दिशा आणि कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
बैठकीत लडाखमधील पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण संरक्षण चळवळीत अभिजीत दिपके यांच्या सहभागाबाबतही चर्चा झाली. तसेच १६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या पहिल्या आंदोलनाच्या नियोजनासाठी आणि मुंबई टीमला सातत्याने मार्गदर्शन केल्याबद्दल इंद्रजीत मोहिते यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेण्यात आली.


प्रणय आहिरे आणि अमोल आसुलकर यांनी दिल्ली तसेच इतर ठिकाणी जाऊन आंदोलनांमध्ये दिलेल्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले. मुंबईतील आंदोलनांच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
मुंबई भेटीचे निमंत्रण अभिजीत दिपके यांनी स्वीकारले असून, मुंबईतील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पुढील काळात महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी आंदोलने, संघटन विस्तार, जनहिताचे प्रश्न आणि पुढील कृती आराखड्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 


या बैठकीमुळे मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीस इंद्रजीत मोहिते, प्रणय आहिरे, अमोल आसुलकर, कुणाल कामेरकर, विजय पडळे, विवेक मोहिते आणि रोहन पालकर उपस्थित होते.
पत्रकार परिषद व कार्यकर्ता मेळाव्यासाठी संपर्क : ९३२४४ ४२१२६
इंद्रजीत मोहिते, मुंबईकर कॉक्रोचेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top