नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात

4,kNews कामोठे दि. 13

पनवेल : रोटरी क्लब पनवेल सनराईझतर्फे सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, कामोठे येथील दहावीच्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अॅप’चे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील १०० विद्यार्थ्यांना या अॅपचा मोफत लाभ देण्यात आला. 


दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा आणि घरच्या अभ्यासादरम्यान प्रभावी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या अॅपमध्ये विश्लेषणात्मक पाठ्यपुस्तक, प्रश्नोत्तरांचा सराव, सरावपत्रिका तसेच व्हिडिओच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक सुलभ आणि परिणामकारक पद्धतीने करता येणार आहे.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, पर्यवेक्षक खेडकर सर, ठाकूर सर, प्राचार्य पालवे सर उपस्थित होते. रोटरी क्लबच्या वतीने डिस्ट्रिक्ट ३१३१चे असिस्टंट गव्हर्नर रतन खरोल, को-चेअर बाळकृष्ण आंबेकर आणि अध्यक्ष काशीराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाची प्रस्तावना रो. गोरेगावकर यांनी केली, तर आभार प्रदर्शन रो. रमेश वायडांडे यांनी केले. गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top