नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती



पनवेल (प्रतिनिधी) आदर्श शैक्षणिक समूह, सकाळ समूह आणि पनवेल टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आदर्श शैक्षणिक संकुल, देवद-विचुंबे येथे करण्यात आले आहे.युवकांच्या विचारांना दिशा देणे, त्यांच्या आकांक्षा आणि प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विकसित भारताच्या संकल्पनेत युवा पिढीची भूमिका अधोरेखित करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.



या कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, सकाळ माध्यम समूह व साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप तसेच आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top