नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

बाळासाहेब स्मृती चषक प्रथम विजेता एमसीसी मोहल्ला पनवेल क्रिकेट संघ


पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जयभवानी क्रिकेट संघ कापड बाजार पनवेल यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे करण्यात आले होते.

यावेळी प्रथम विजेता एमसीसी मोहल्ला पनवेल क्रिकेट संघ तर द्वितीय विजेता बजरंग इलेव्हन पारगांव व बेस्ट बॉलर शाहिद शेख. बेस्ट बॅट्समन नौमन पटेल मालिका वीर नरेश गायकवाड पारगाव यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत व युवा सेना सरचिटणीस अवचित राऊत यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.


सदर क्रिकेट सामन्याचे आयोजन शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रवीण पोपटराव जाधव यांनी केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन तालुकाप्रमुख संदीप तांडेल व ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी या क्रिकेट सामन्याला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाप्रमुख शिरिष घरत, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, आ.विक्रांत पाटील,

मा.आ.बाळाराम पाटील, युवासेना सहसचिव अवचित राऊत, काशिनाथ पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, महिला महानगर संघटीका लीना गरड, जिल्हा सल्लागार शिरिष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, मा.नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, सुरेखा मोहोकर, शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, अश्‍विनी देसाई, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, कळंबोली शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, मधुभाऊ पाटील आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top