नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत


मंत्री पदाच्या दीर्घ प्रतिक्षेत असणारे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडताच रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेल मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख परेशभाई पाटील व महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सत्कार व स्वागत सोहळ्यात पनवेल मधील कळंबोली सर्कल येथून बाईक व गाड्यांच्या रॅलीने भरतशेठ गोगावले यांना पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेण्यात आले.

तेथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी व पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर हे देखील उपस्थित होते. डीजे- ब्रास बँड यासह जेसीबी मधून फुलांची उधळण करत तब्बल 50 फुटी हार घालून फटाक्यांच्या आतिषबाजीत भरत शेठ गोगावले यांचा भव्य सत्कार व स्वागत करण्यात आले. पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील त्यांनी मानवंदना दिली.

शिवसेनेच्या या सोहळ्यात परेश पाटील , प्रथमेश सोमण यांच्यासह संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, शिल्पाताई देशमुख, महिला उत्तर रायगड जिल्हाप्रमुख सुप्रिया साळुंखे, महानगर संघटक मंगेश रानवडे, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, महेश सावंत, महिला जिल्हा संघटिका रीना पाटील, तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, महिला महानगर प्रमुख सुलक्षणा जगदाळे, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, कामोठे शहरप्रमुख सुनील गोवारी, कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, खांदा कॉलनी शहरप्रमुख शिवाजी थोरवे, कळंबोली शहर संघटिका ज्योतीताई पाटील, पनवेल शहराच्या प्रीती खानविलकर, अर्चना जाधव,

पनवेल शहर संघटक अभिजीत साखरे, अर्जुन परदेशी, शैलेश जगनाडे, तोफिक बागवान, इतर सर्व विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक महादेव दिघे यांनी सक्रिय सहभाग व उपस्थिती दर्शवली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नितीन पाटील यासह पनवेल महानगर क्षेत्रातील सर्व विभागांचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक नागरिक व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेलकरांचे पाणी प्रश्न टॅक्स प्रश्न इत्यादी विषय गोगावले साहेबांच्या पुढाकाराने यापुढे लवकरात लवकर सोडवले जातील अशी खात्री पत्रकारांशी बोलताना परेश पाटील व प्रथमेश सोमण यांनी दिली. पुढे वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास शिरढोण येथे अभिवादन करून मंत्री भरत गोगावले त्यांच्या महाड या मतदारसंघाकडे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top