पनवेल, दि.22 (4kNews) ः पनवेल तालुक्यातील केवाळे येथील रामकृष्ण अॅकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक खेळ महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या अॅकॅडमीत नर्सरी ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळ प्राविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामध्ये प्रामुख्याने धावणे, रिले, कबड्डी, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, रस्सी खेच अशा विविध प्रकारच्या वैयक्तीक व सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळ महोत्सवाचे उद्घाटन अॅड.मनोज भुजबळ आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी विद्याधिराज चॅरिटेबल ट्रस्टचे व्यंकटरमण भट तसेच खास अमेरिकन या कार्यक्रमासाठी आलेले योगेश पै त्यांच्या पत्नी सौ.उमा पै व मुलगी प्रिया पै हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी शाळेला 8500/- रुपयाची देणगी सुद्धा दिली. यावेळी मंचावर शाळेचे मुख्याध्यापक दिपक तावडे, मुख्याध्यापिका हर्षलता चिमणकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्ताने मुख्याध्यापक दिपक तावडे यांनी प्रमुख पाहुणे अॅड.मनोज भुजबळ यांचा विशेष सत्कार व परिचय करून दिला.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मानवी मनोर्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी बोलताना अॅड.मनोज भुजबळ यांनी सांगितले की, यशाबरोबरच अपयश पचविण्याचे कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात उंच भरारी वेगळ्या क्षेत्रात मारावी यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी आपण तयार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यानिमित्ताने प्रथम कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सौ.सोनल मॅडम यांनी मानले.
