4k समाचार दि. 28
पनवेल शहर पोलिस ठाण्यात सावित्री पेट्रोल पंपाचे मालक मंजयकुमार राय यांच्यावर बालकामगार ठेवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी पनवेलमध्ये कारवाई केली असता, पेट्रोल पंपावर केवळ १३ वर्षीय मुलगा गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम करताना आढळला. मुलाच्या वयाची कोणतीही अधिकृत कागदपत्रे मालकाकडे नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली.

बालकामगार कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे मंजयकुमार राय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
