4k समाचार दि. 28
नवी मुंबईतील कोपरी येथील एका गाळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी छापा टाकला.

या कारवाईत विक्रीसाठी आणलेला तब्बल दीड लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी राजीव झा, सत्या शुक्ला, मुमताज अहमद आणि शैलेश यादव या चौघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
