4k समाचार
पनवेल दि. 30 ( वार्ताहर ) : अल्पावधीतच राज्यभरात लोकप्रिय ठरलेली नाट्य आणि सिने बालकलाकार अर्जुनी हिने पनवेलमधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले .

सर्वप्रथम मा. नगरसेवक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अभिनव युवक मित्र मंडळ आयोजित ‘पायोनियरचा राजा’ चे दर्शन घेतले. या ठिकाणी केलेल्या सुबक व आकर्षक सजावटीचे अर्जुनीने मनापासून कौतुक केले.या प्रसंगी मंडळाचे जेष्ठ सदस्य पत्रकार संजय कदम, कास्टिंग डायरेक्टर व भाजपा सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, मा. नगरसेवक समीर ठाकूर, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे तसेच भूषण पोवळे उपस्थित होते.

यावेळी जे. जी. पाटील सर आणि पाटील कुटुंबीयांनी अर्जुनीला पुढील कारकिर्दीसाठी आशिर्वाद दिले.यानंतर अर्जुनीने मानघर येथील श्री स्वामी समर्थ मठात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला. या ठिकाणी मठाधिपती किशोर पाटील सर विशेषतः उपस्थित होते. त्याचप्रमाणे मा. नगरसेवक डी. आर . भोईर यांच्या सुद्धा गणपतीचे तिने दर्शन घेतले .
फोटो – अर्जुनी हिने पनवेलमधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट
