नवीन बातम्या
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा
फलटणच्या रंजीत जाधवचा सायकल प्रवास

4k समाचार दि. 30
पनवेल ता. (बातमीदार)
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सायकलवरून वडगाव, फलटण (जि. सातारा) येथून निघालेला तरुण रंजीत जाधव अखेर मुंबईत दाखल झाला आहे. या प्रवासात कळंबोली येथे मुक्कामादरम्यान सकल मराठा समाज कळंबोलीचे अध्यक्ष रामदास शेवाळे व शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक यांनी त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, निलेश दिसले, महेश गोडसे सूर्यकांत, राहुल ढेंबरे, प्रेम गोडसे उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या चळवळीस दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपस्थितांनी रंजीतचे कौतुक केले.

फलटण तालुक्यातील वडगाव गावचा रहिवासी रंजीत जाधव याने सायकलवरून तब्बल  230 किमीचा प्रवास करत कळंबोलीपर्यंत मजल मारली. या प्रवासादरम्यान समाजातील अनेक ठिकाणी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागतही केले. रंजीत जाधव पहाटे मनोज जरांगे पाटील यांच्या वाहन ताफ्यासह मुंबईतील आझाद मैदान गाठणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. 


यावेळी बोलताना सकल मराठा समाज कळंबोलीचे अध्यक्ष रामदास शेवाळे म्हणाले, “रंजीत जाधव याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्याने दाखवलेले धैर्य आणि चिकाटी समाजातील तरुणांना स्फूर्ती देणारी ठरेल. आरक्षणाच्या प्रश्नावर उभे राहण्यासाठी आजची पिढी अशा पद्धतीने पुढे येत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.” मराठा आरक्षणाच्या चळवळीला दिलेला हा अनोखा पाठिंबा समाजाच्या लढ्यात उत्साह वाढवणारा ठरत असून, रंजीत जाधवचे नाव प्रेरणादायी युवा कार्यकर्त्यांमध्ये गणले जाईल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top