पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः शहरातील पटेल मोहल्ल्यात तब्बल 100 पेक्षा जास्त काविळीचे रुग्ण आढळल्याने पनवेल महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेने या भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला, पाडा मोहल्ला, पटेल मोहल्ला भागात कावीळ लक्षणे असलेले रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे.

या भागातील खासगी डॉक्टरांनी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांना काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. पनवेल महानगरपालिकेने याची दखल घेतली आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या पथकांनी घरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे.
