एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने सोमवारी सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. शिवसेना आमदारांची बैठकही पुढे ढकलण्यात आली.

शिंदे ठाण्यात राहून आराम करणार असून दिल्लीतील भाजप बैठकीला त्यांचा सहभाग शक्य नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, 5 डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी अपेक्षित असला तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिपदे याबाबत अजून निर्णय झालेला नाही.

मागील आठवड्यात दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे दरे गावी गेले होते, तिथेच त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजते.
