महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अजित पवारांचा ‘सोनेरी काळ’ सुरू झाल्याचे दिसत आहे.

शरद पवार गटातील माजी आमदारांनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते अपूर्व हिरे यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली आहे. निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या गटात गेलेल्या हिरे यांच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, शरद पवार गटातील राहुल जगताप व मानसिंग नाईक यांसारखे नेतेही अजित पवारांच्या संपर्कात आहेत. यामुळे, निवडणूक निकालानंतर अजित पवारांचा ‘प्लॅन बी’ यशस्वी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
