4k समाचार दि. 13
मुंबई (प्रतिनिधी) – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट, आंबेडकरी संघटना आणि सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र येत आहेत. या मागणीसाठी 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानपर्यंत शांततापूर्ण विराट रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मुंबईतील सर्व बौद्ध व आंबेडकरी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले गट) गटाचे मुंबई प्रदेश महासचिव आयु. विवेक गोविंदराव पवार यांनी केले आहे.

( आठवले गट) गटाचे मुंबई प्रदेश महासचिव आयु. विवेक गोविंदराव पवार म्हणाले की, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे जागतिक पवित्र तीर्थक्षेत्र असूनही आजही
बौद्धांच्या पूर्ण ताब्यात नाही. ज्या कर्मकांड, पिंडदान व अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला, तेच प्रकार आज महाबोधी महाविहार परिसरात सुरू आहेत, हे दुर्दैवी आहे. या कारणामुळे जगभरातील बौद्ध समाजाच्या भावना .दुखावल्या जात आहेत.

मुंबई प्रदेश महासचिव आयु. विवेक गोविंदराव पवार म्हणाले ,“प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ त्या धर्माच्या विश्वस्तांच्या ताब्यात असते, मग बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? बौद्ध विहार ट्रस्टमध्ये बौद्ध ट्रस्टी का नसावेत? हे अन्यायकारक आहे. म्हणूनच आम्ही या आंदोलनातून हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचा निर्धार केला आहे.” महाबोधी महाविहार बौद्धाचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे
या महामोर्च्याच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक प्रतिष्ठित बौद्ध नेते, भिक्खू व रिपब्लिकन गटाचे मान्यवर पुढाकार घेत आहेत. यामध्ये केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नाना इंदिसे, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, अर्जुन डांगळे, अक्षय आंबेडकर, राजू वाघमारे, जयदेव गायकवाड, अविनाश महातेकर, राम पंडागळे, भाई गिरकर, तानशेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर, सुरेश केदारे, सागर संसारे, नितीन मोरे, दिलीप जगताप, मिलिंद सुर्वे, विलास रुपवते, रवी गरुड, आकाश लामा यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
तसेच पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो, भदंत विरत्न थेरो, भदंत आयुपाल, भदंत शांतीरत्न, भदंत लामा यांसारखे वरिष्ठ भिक्खूही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले गट) गटाचे मुंबई प्रदेश महासचिव आयु. विवेक गोविंदराव पवार यांनी आव्हान केले आहे.
.महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे फक्त बुद्धगया पुरते मर्यादित नाही, तर हे जगभरातील बौद्ध समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. म्हणूनच मुंबईतील सर्व बौद्ध संघटना, संघटनांचे पदाधिकारी, भिक्खू संघ, तसेच रिपब्लिकन पक्षाचे सर्व गटांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
