4k समाचार दि. 10
सांताक्रूझ (प्रतिनिधी): बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५३ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षा समाप्तीचा कार्यक्रम भगवान गौतम बुद्ध विहार, भीमवाडा सांताक्रूझ येथे उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे गोवर्णिंग बॉडी सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. धम्मगुरू भंते महानाम यांच्या मधुर वाणीतील धम्मदेशनेने उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, “भगवान बुद्धांचा धम्म हा मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. पंचशीलाचे पालन करून सत्य मार्गाचा अवलंब करणे हेच खरे उपासकत्व आहे.”
भंते महानाम यांनी या प्रसंगी सांगितले की, “महिला समाजाच्या मुक्तीसाठी आणि सामाजिक समतेसाठी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जीजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदान या दरम्यान एक भव्य धम्ममोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व बौद्ध बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५३ आणि महिला मंडळतर्फे भंते महानाम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विजय गमरे, अक्षय गमरे, संदीप गणपत जाधव, संदीप प्रमोदपाल, संगम मोहिते तसेच महिला मंडळतर्फे साधना सूरदास, रजनी गमरे, संध्या पवार, वर्षा कदम, माधुरी मोहिते, स्मिता गमरे, उन्नती गमरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशासाठी महेंद्र जाधव, संदीप ढोरे, सुनील तांबे, सिद्धार्थ मोहिते यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी मंडळाच्या वतीने सामूहिक भोजनदानाचे आयोजन करण्यात आले.
