पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत झालेल्या भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेत रुस्तम ए हिंद लाली गुरुदास पोल (पंजाब) या पैलवानाने इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान जलाल इराणला चारीमुंड्या चित करून ‘किताब’ पटकावला.

लाली गुरुदास पोलला पाच लाख रुपये व मानाची गदा देऊन पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नमो चषकचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.

या सामन्यांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समितीचे माजी सभापती व स्पर्धा संयोजक अमर पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक राजू शर्मा, तेजस कांडपिले, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, कळंबोली भाजप अध्यक्ष रविनाथ पाटील, कळंबोली शिवसेना शहर अध्यक्ष तुकाराम सरक, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, कळंबोली गुरुद्वारा अध्यक्ष नारिंदर सिंग भुल्लर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमर ठाकूर, मनिषा निकम, पै.बबन पवार, पै. रुपेश पावशे, योगेश लहाने, गौरव नाईक, देविदास खेडकर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, यांच्यासह कुस्तीप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी हलगीच्या नादात खेळाडू आणि मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. एकाहून एक रोमांचक सामने, भव्य दिव्य स्वरूपात आयोजन, प्रेक्षकांची तुफान गर्दी, खणखणीत आवाजात कुस्तींचे समालोचन यामुळे वातावरण उत्साहपूर्ण होते.

महिलांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पै. अमेधा घरत (पनवेल) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अंकिता फातले (कोल्हापूर) यांचा खास आकर्षण सामना झाला त्यामध्ये अमेधा घरतने बाजी मारत ५१ हजार रुपये व मानाची गदा पटकावली. वरिष्ठ मुले ७९ ते १२५ किलो वजनाखालील गटात शुभम वरखडे याने श्रेयस करे याचा पराभव करून नमो केसरी मानाची गदा पटकावली. ७० ते ७९ किलो वजनाखालील गटात प्रतीक हातमोडे प्रथम क्रमांक तर विशाल पुजारी द्वितीय क्रमांक, ६० ते ७० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक किरण ढवळे, साजन पावशे द्वितीय क्रमांक, ५० ते ६० किलो वजनाखालील

गटात प्रथम क्रमांक राज पाटील तर द्वितीय क्रमांक सूरज झा, ७० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक सुदर्शन आसदर, वेदांत यलकर द्वितीय, ६५ किलो वजनाखालील गटात भूषण पवार प्रथम क्रमांक, प्रीत भोईर द्वितीय, ६० किलो वजनाखालील गटात वेदांत पाटील प्रथम क्रमांकमी द्वितीय क्रमांक रुद्र पाटील,५५ किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक ओम म्हात्रे, सुमित विरकर द्वितीय क्रमांक, ५० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक शुभम करांडे, द्वितीय अभिषेक साह, ४५ किलो वजनाखालील गटात विश्वजीत घोगे प्रथम क्रमांक, सनी कुमार द्वितीय,४० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक सुनील म्हात्रे, सोहम ढणे द्वितीय क्रमांक, ३५ किलो वजनाखालील गटात तनिष्क पाटील प्रथम क्रमांक, नितेश मंडळ द्वितीय, तसेच १७ वर्षाखालील मुले गटातील ३० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक करण कातकरी तर द्वितीय क्रमांक आशिषकुमार पाल याने पटकावला. महिला ५७ ते ७६ किलो वजनाखालील गटात रितिका कारंडे हीच पराभव करत अमेधा घरत हिने प्रथम क्रमांक पटकावून नमो केसरी मानाची गदा मिळवली.

५० किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक शौर्या कोळेकर, द्वितीय क्रमांक श्रुती कोंडविलकर, ४५ किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक ईश्वरी गळवे तर द्वितीय क्रमांक साची महतो, ४० किलो वजनाखालील गटात निर्जला साही प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक निलम कातकरी हिने मिळवला. या स्पर्धेत महिलांच्या गटातील महाराष्ट्र चॅम्पियन पै. अमेधा घरत हिने तीनही सामन्यात विशेष चमकदार कामगिरी केली. त्यामुळे ती या स्पर्धेतील लक्षणीय पैलवान ठरली. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती व स्पर्धा संयोजक अमर पाटील आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
