4k समाचार दि. 18
पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवा नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विकासज देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्कूलची पाहणी केली व स्कूलच्या कामाचा, प्रगतीचा व मराठी माध्यम विभागाचा आढावा घेतला तसेच स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंसिलचे ज्येष्ठ सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यमचे मुख्याध्यापक दीपक भरणुके, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे पीआरओ बाळासाहेब कारंडे, भाजपचे उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर, धीरज ओवळेकर, शिवाजी अहिरकर, हर्षल फडके आदी उपस्थित होते.
