4k समाचार
पनवेल : पनवेल शहर पोलिस व परिमंडळ २ च्या गुन्हे शाखेने केवळ एका महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३८ गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान ५७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या मते, या आरोपींमध्ये देशातील विविध राज्यांतील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकरणांतील गुन्हेगारांचा समावेश आहे. चोरी, घरफोडी, लूट, फसवणूक यांसह गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना गजाआड करण्यात आले.

पथकाने केलेल्या काटेकोर तपासानंतर ही मालमत्ता जप्त करण्यात आली असून, या भव्य कामगिरीबद्दल पनवेल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
