4k समाचार दि. 12
ऐरोली येथील मुथ्यूट फिनकॉर्प संस्थेत बनावट सोने गहाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची ओझा या तिघांविरुद्ध रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी यापूर्वी नकली सोने गहाण ठेवून १ लाख २७ हजार रुपये कर्ज घेतले होते. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी सांची ओझा ही पुन्हा दोन सोन्याच्या साखळ्या गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी आली असता, त्या दागिन्यांचे सोनं बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले.याबाबत संस्थेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली असून, पुढील तपास रबाळे पोलिस करत आहेत.
