4k समाचार दि. 12
नेरूळ सेक्टर २१ परिसरात रविवारी सकाळी दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन नागरिकांवर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्याची घटना घडली. या चोरीत अंदाजे ४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने लंपास झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सरबजीत भोब्रा आणि प्रमोद गवारे हे दोघेही पायी जात असताना, दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळ काढला. घटनेनंतर पीडितांनी तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली.

दरम्यान, नेरूळ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
