4k समाचार
पनवेल दि.22(वार्ताहर): शिंदे गटाचे कोकण सचिव, निरीक्षक, आयटी सेल कोकण प्रदेश प्रमुख रुपेश पाटील सध्या कोणता झेंडा हाती घेणार याकडे पनवेलसह नवी मुंबई, मुंबई आणि रायगड मधील शेकडो कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

गेली अनेक वर्षे शिवसेनेत काम केलेले राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील हे ह्या आधी आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते, शिंदे यांच्या उठावानंतर त्यांना श्रीकांत शिंदे यांचे जवळचे आणि विश्वासू मानले जाऊ लागले. शिंदे गटात युवासेना स्थापानेची प्रमुख जबाबदारी त्यांनी सांभाळली, अनेक नेते, नगरसेवक, जिल्हा प्रमुख व उरण पनवेल मधील आता मोठ्या पदांवर असलेल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्यांच्या मार्फत झालेले आहे. शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना दुबई येथील आंतराष्ट्रीय उद्योग बैठकीला नेण्याचे मोठे कार्य पाटील यांनी केले होते, पनवेल उरण मधील युवासेना हि त्यांनी स्थापित केली होती, मात्र असे असतांना गेल्या महिन्यात त्यांना अचानक पक्षातून बरखास्त करण्यात आले.

आणि त्याच्या बातम्या प्रेरित करण्यात आल्या, त्यांच्या सकट पनवेल उरण मधील शेकडो युवासेना पदाधिकाऱ्यांना बरखास्त करण्यात आले, मात्र ह्या बाबत त्यांना विचारले असता त्याबाबत बोलतांना त्यांनी सांगितले कि हे मी मुख्यमंत्री शिंदे साहेब व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या असलेल्या जवळीक व माझी वाढती लोकप्रियता, वरिष्ठांनी अनेक पदांची माळ माझ्या गळयात टाकल्यामुळे मुळे अंतर्गत राजकारण करून अनधिकृतपणे बारखास्ती पत्रक काढण्यात आले, रुपेश पाटील हे राष्ट्रीय सचिव पदावर होते, शिवसेना निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक होती, शिवसेनेच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या सरचिटणीस पदावर ते होते, शिवसेनेच्या सोशल मीडिया कोकण प्रदेशाचे ते प्रमुख होते, ह्याच मुळे त्यांना एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे ४- ५ दिवस दिल्लीत असल्यावरच हे खोटे राजकारण करून बारखास्ती पत्रक काढले गेले तथा पत्रावर एका सचिवाची सही आहे त्यामुळे एक सचिव दुसऱ्या सचिवाला काढणे म्हणजे हास्यास्पद आहे,

पण बरखास्तीच अनधिकृत असल्याने आणि माझी राजकीय बदनामी करण्या करिता हे षडयंत्र केले असल्याचे रुपेश पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र काही दिवांपासून अचानक त्यांच्या पक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा सुरु झाल्याने रायगड शिवसेनेत आणि युवासेनेच्या राष्ट्रीय फळीत चर्चा सुरु झाली आहे. त्यातच त्यांची रायगड चे उबाठा शिवसेना नेते बबनदादा पाटील यांच्या सोबत झालेली मिटिंग, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या सोबत वाढलेला संपर्क आणि जिल्ह्यातील भाजप चे जेष्ठ नेते तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सोबत जवळीक ह्यातून ते नेमक्या कोणत्या पक्षात जाणार आहेत ह्या बाबत चर्चेला उधाण आले आहे.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि नेमक्या त्याचे वेळी पनवेल उरण मधून शेकडो पदाधिकाऱ्यांची सोडचिट्ठी हे शिंदे गटाच्या निवडणूक वातावरणास झटका देणार ह्यात वाद नाही! ह्या बाबत सचिव रुपेश पाटील आणि काही मोठ्या पदाच्या सहकाऱ्यांसोबत संपर्क केला असता त्यांनी ह्या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले आहे. तरी नेमके हे शेकडो प्रमुख पदाधिकारी कोणत्या पक्षाची कास धरणार ह्याचे गूढ वाढल्याचे दिसून येत आहे.
फोटो: रुपेश पाटील
