4k समाचार
पनवेल (प्रतिनिधी) :
नवीन पनवेल शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल महानगरपालिका प्रशासकीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त मा. गणेश किसनराव शेटे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. शहर अध्यक्ष शिवाजी उत्तमराव साळवे व शहर महासचिव किरण बाबुराव सोनावणे यांनी या निवेदनाद्वारे नागरिकांच्या समस्या मांडल्या.

शहरातील रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते” असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
