पनवेल दि.१६(संजय कदम): उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल उरण येथे शालेय परिवहन समितीच्या बैठकीस भेट देण्यात आली. सदर बैठकीस मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, बस चालक व ऑपरेटर प्रतिनिधी, परिवहन प्रभारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

बैठकीदरम्यान उरण वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन पो.उप.नि. उद्धव सोळंके यांनी केले. यावेळी शालेय बसची तांत्रिक तपासणी, चालकांची पात्रता व बसवरील सुरक्षा साधनांची (CCTV, GPS, फर्स्ट एड बॉक्स इत्यादी) उपलब्धता तपासण्याबाबत विशेष निर्देश देण्यात आले. तसेच उपस्थित केलेल्या शंकांचे निराकरन करण्यात आले.
