शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि श्रीगोंदा विधानसभेतील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे.

तसेच, शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंग नाईक देखील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. या भेटींमुळे दोघेही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींमुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
