मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देणाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून ही धमकी दिली होती.

धमकीचा फोन कंट्रोल रूमला येताच फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. मोबाईल नंबरवरून पोलिसांनी त्याच्या राहत्या ठिकाणाची माहिती मिळवली असता, तो सापडला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
