१४ वर्षीय मुलीने रात्रीच्या दरम्यान करंबळी येथील खेळाच्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली. आरोपी सुनील भगत याने मुलीला लग्नाचे वचन दिले होते. मात्र, त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तणावाखाली आल्याने मुलीने गळफास घेतला.
