पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल विधानसभा-188 महाविकास आघाडी मार्फत महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान मराठी भाषेच्या विरोधात मुंबई, महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा ही सक्तीची नाही असे बेताल वक्तव्य करून मराठी माणसाचा अपमान करणार्या आर.एस.एस.चे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार व पनवेल उरण महाविकास आघाडी अध्यक्ष बाळाराम पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल शेकापचे गणेश कडू, काँग्रेसचे हेमराज म्हात्रे, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, खारघर शहर प्रमुख गुरु म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर, उपमहानगर संघटिका सौ. संचिता राणे, खरघर शहर संघटिका सौ. संपदा धोंगडे, कामोठे शहर संघटिका सौ. संगीता राऊत, सौ. उज्वला गावडे यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यरते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
