नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा


वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणार्‍या कर्तृत्ववान डॉक्टर महिलांचा केला सत्कार
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणार्‍या कर्तुत्वावर महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.तसेच प्राणिक हिलिंग प्रणालीच्या माध्यमातून रुग्णसेवा देणार्‍या कर्तुत्ववान महिलांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा समजून समर्पण भावनेतून समाजसेवा करणार्‍या कर्तुत्ववान महिला डॉक्टरांना यावेळी शाल,श्रीफळ, सन्मानपत्र पुष्पगुच्छ आणि श्रीमद् भगवद्गीतेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.


सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणून पनवेल तालुका पत्रकार विकास मंच प्रचलित आहे. तब्बल दोन दशकांहून जास्त कालावधीत पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्या वतीने दुर्गम क्षेत्रातील विविध जिल्हा परिषद शाळांच्यातून शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, अभ्यास दौरे, सन्मान संध्या असे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो.

यंदाचे वर्षी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतुल्य योगदान देणार्‍या डॉ.जयश्री पाटील,डॉ. समिधा गांधी, डॉ. विशाखा म्हात्रे, डॉ. कांचन पाटील वडगावकर, डॉ मानदा पंडित यांना सन्मानित करण्यात आले.तर प्राणिक हिलिंग या प्रणालीच्या माध्यमातून रुग्णसेवा देणार्‍या सौ. अर्चना विवेक पाटील आणि सौ मेघना संजय कदम यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर जयश्री पाटील म्हणाल्या की आज स्त्रीने स्वतःची प्रकृती सुदृढ ठेवणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्व तिने आपल्या सुरक्षेला देखील दिले पाहिजे. भारतीय न्याय संहितेच्या 498 कलमाच्या अनुषंगाने प्रत्येक स्त्रीने आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या कायद्याचे अध्ययन केले पाहिजे.

त्या म्हणाल्या की पनवेल तालुका पत्रकार विकास मंच नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबवत असतो. हृद्य सत्कार केल्याबद्दल त्यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे मनःपूर्वक आभार मानले. तर सौ मेघना संजय कदम यांनी प्राणिक हिलींग बाबत उपस्थितांना अवगत केले. तसेच स्पर्श आणि औषध विरहित ही उपचार पद्धती काळाची गरज असल्याचे सांगितले.यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, दत्तात्रय कुलकर्णी,राजू गाडे,सुनील राठोड,वैभव लबडे आदी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top