पनवेल (प्रतिनिधी):
“लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांसारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे या तालुका व जिल्ह्याचा विकास रोखणे अशक्य आहे,” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले.

ते चिपळे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी (दि. १९ जुलै) बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले प्रमुख उपस्थित होते.
या पुलामुळे नेरे, चिपळे, वाजे, गाढेश्वर, धोदाणी, मालडुंगे या गावांची एकमेकांशी जोडणी अधिक मजबूत झाली असून, नागरिकांसाठी प्रवास सुलभ झाला आहे.

पुलाचा इतिहास आणि गरज
सन १९७५ साली बांधण्यात आलेल्या जुन्या पुलाचे आयुष्य संपत आले होते. विशेषतः २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले. पुलाची स्थिती धोकादायक बनल्याने नागरिकांकडून नवीन पुलाची मागणी होऊ लागली. ही गरज ओळखून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून अर्थसंकल्पीय तरतूदीतून १० कोटी रुपये खर्च करून हा नवीन पूल उभारण्यात आला. ६६ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असलेल्या या पुलामुळे स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, या विकासकामासाठी नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात खालील मान्यवरांचा समावेश होता:
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी
भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत
पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर
भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रल्हाद केणी
टीआयपीएल संचालक अमोघ ठाकूर
भाजप पनवेल तालुका पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील
माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, एकनाथ देशेकर माजी सरपंच रमेश पाटील
शिवाजी दुर्गे, वासुदेव गवते, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील
शिवकर ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे
डॉ. रोशन पाटील, विश्वजित पाटील, मयूर कदम, गौरव कांडपिळे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित
या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते:अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, एस. एस. गांगुर्डे. कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण. उप विभाग अधिकारी मिलिंद चव्हाण
सहाय्यक अभियंता प्रज्ञा पाटील
