पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती दिनानिमित्त महाड येथील क्रांती स्तंभास भेट देऊन अभिवादन केले .

सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे जाऊन अभिवादन केले. व सरते शेवटी क्रांती स्तंभाचे दर्शन घेऊन त्यास अभिवादन केले .

त्यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे महासचिव अशोक वाघमारे ,मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे, मुंबई प्रदेशचे युवा अध्यक्ष सिद्धार्थ पेडणेकर , रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे महाडचे अध्यक्ष सुजित जाधव महाड शहराध्यक्ष सुनील जाधव निलेश कांबळे मनोज कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
