नवीन बातम्या
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी
समाजसेवेच्या व्यापक उद्देशाने ‘केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना
रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न
WordPress.org blog: WordPress 7.1 Release Candidate 1
WPTavern: #228 – Priscilla Collado Ramirez on Reducing WordPress Beginner Anxiety

*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*


पनवेल, दि.२४ (वार्ताहर) : पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने  “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले. 


 पनवेल शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे दरवर्षी व्यवसाय करतानाच समाजासाठी काम करणाऱ्या एखा‌द्या सेवाभावी व्यक्तीला व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असते. पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी 3131 चे जिल्हा गव्हर्नर शीतल शाह यांच्या हस्ते “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी रोटरी जिल्हा प्रथम महिला रागिणी शाह, सहाय्यक गव्हर्नर डॉ. किरण कल्याणकर, पीडीजी डॉ. गिरीश गुणे, अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, रोटेरियन आणि अनस, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top