पनवेल/प्रतिनिधी
सिडकोतर्फे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना रोजगारा निमित्त 221 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली आदि ठिकाणी ठेकेदार मेसर्स विशल प्रोटेक्शन फोर्स मालाड यांच्या तर्फे 1994 पासून कार्यरत आहेत. ते ही किमान पगार, महागार्ई भत्ता, घर भाडे भत्ता, रजा, युनिफॉर्म आदी सुविधा देत नाहीत. या संदर्भात एक वर्षापूर्वी मागणी करुनही सदर सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदणीकृत करुन घेतलेले नाही.

तसेच 22 सुरक्षा रक्षकांना एप्रिल 2024 पासून पगार देण्यात आलेला नाह. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचार्यांची जबाबदारी सिडको-पनवेल आणि सुरक्षारक्षक मंडळानेही घेतलेली नाही. यासाठी 19 मार्च रोजी सुरक्षा रक्षक मंडळावर 221 सुरक्षा रक्षकांच्या त्वरीत नोंदण्यांवरुन बोर्डात समाविष्ट करुन घ्यावे या मागणी साठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी लवकरात लवकर नोंदणी न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

जोपर्यंत 221 सुरक्षा रक्षकांच्या सरसकट नोंदण्या होत नाहीत तो पर्यंत पनवेल पालिकेस बोर्डातर्फे एकही सुरक्षा रक्षक पुरविला जावू नये तसे केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही हिंद मजदूर किसान पंचायतने दिला आहे. 22 सुरक्षा रक्षकांना मागील एक वर्षे पगार दिलेला नाही तो पगार सिडको-पालिका कि सुरक्षा रक्षक मंडळाने निर्णय घेवून त्वरीत देण्यात यावा तसेच सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम व अटी डावलून सिडकोला खाजगी ठेकेदाराने सुरक्षा रक्षक एजन्सी सुरु ठेवल्याप्रकरणी त्याच्यावर पैशाच्या हव्यासापोटी कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही हिंद मजदूर किसान पंचायतने केला आहे. या सर्व मागण्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत तर्फे देण्यात आला.
