गोंदीयाच्या सडक अर्जुनीमध्ये महामंडळाची शिवशाही बस उलटल्याची भीषण घटना घडली आहे. खजरी गावाजवळ बसचा अपघात झाला आहे.

या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या दुर्घटनेवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे, प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना एकनाथ शिंदेंनी 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
