सेक्टर १७ कळंबोली येथील सबस्टेशनच्या रोहित्रामध्ये असलेल्या तांब्याच्या तारा आणि ऑइलची चोरी केल्याप्रकरणी आरोपी विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

७५ हजार रुपये किमतीच्या साडेचारशे किलो वजनाच्या तांब्याच्या तारा आणि ५८ हजार ४०० रुपये किमतीचे ७३० लिटर ऑइलची चोरी झाली आहे. त्यामुळे महावितरण चे अधिकारी सतर्क झाले असून, सबस्टेशनमध्ये पूर्णवेळ सुरक्षा अधिकारी नेमण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे.
