नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक

4k समाचार
पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंत सर्वजण देत आहेत .  

   लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची  पंगत जमिनीवर त्यानंतर खुर्ची टेबलावर आता मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे .  लग्न सराईच्या हटके पद्धतीत बुफे पद्धतीला मान देण्यात येत असल्याने ग्रमीण भागात सुद्धा पंगतीच्या जागी बुफे पद्धत जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्याच प्रमाणे सभागृहासह ओपन लॉनवर शुभमंगलला पसंती मिळत आहे. त्या जोडीला संगीतमय मंगलाष्टकांची रेलचेल आहे. बाहेरील बाजूस फोटो सेक्शनसाठी विविध आकर्षक सजावट करण्यात येत असून लग्नसमारंभ हा इन्हेंट ठरत आहे. पूर्वी तुलसी विवाहनंतर खऱ्या अर्थाने  लग्न सराईला  सुरुवात होत असे व त्यानंतर  बाजारपेठांमध्ये लग्रसराईचा साज चढू लागत असे . विवाह समारंभांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलकर बाजारपेठसह देण्याघेण्याच्या वस्तू साठी मुंबई-दादर, पुणे आदी ठिकाणी जात असल्याने वधूवर कडच्या मंडळींची गर्दी दिसून येत असे . यावर्षी १६ नोव्हेंबरपासून लग्राचा बार उडण्यास सुरुवात झाली असून ६ मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये २ व ५ रोजी मुहूर्त आहेत तर २०२६ हे वर्ष लग्न आणि शुभ कार्यासाठी खूपच चांगले असल्याचे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. २०२६ या वर्षात एकूण ५९ शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे या शुभमुहूर्तावर लग्न  करणाऱ्यांची संख्या जास्त आहे .  

या लग्र सराईसाठी पनवेल परिसरातील सभागृहासह लॉन, हॉटेल व्यवसायिक सज्ज झाले आहेत. सद्य स्थितीत लग्राचा ट्रेंड बदलत चालल्याने लॉनच्या  मोकळ्या जागेत सायंकाळी बहुतांशी लग्न उरकण्यात येत आहे. या ठिकाणी विविध पदार्थ याची रेलचेल असते मोठ्या शहरातील शाही विवाहाची परंपरा ग्रामीण भागात रुज्जू पाहत असल्याने या ठिकाणी राबणाऱ्या अनेक जणांना सुगीचे दिवस आले आहेत. लग्न सराईमध्ये जेवणावळीमध्ये पंजाबीसह चायनीज पदार्थाची रेलचेल आहे. त्याच्या जोडीला जेवणावळीनंतर पान-मसालासह आईस्क्रीम जोडीला असते मोठ्या शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा ही पद्धत जोर धरू लागली आहे. पंगत बसलाय व वाढायला जेवढा वेळ लागतो त्या पेक्षा कमी वेळात शेकडो माणसे बुफे पद्धतीत जेवण जेवून बाहेर पडत असतात त्याच प्रमाणे बसण्याची आकर्षक रचना असते बुफे कांऊटरवर हवे तसे घेता यते या मुळे ही पद्धत सर्वत्र दिसून येत आहे.सध्या  लग्नाचे स्वरूप बदलते होत असून हटके लग्न सराई करण्याकडे अनेकांचा जोर आहे . त्यातच वेगवेगळे इव्हेंट ,संगीत ,संगीत पार्टी आदी प्रकार वाढत चालले आहेत . पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग मैदान तर तालुक्यातील राज रिसॉर्ट , विसावा  रिसॉर्ट ,रिहाना फार्म हाऊस , काकाजींनी वाडी ,छाया रिसॉर्ट , आयुष्य रिसॉर्ट आदी कडे विवाह सोहळा करण्याकडे लोकांचा कल असून या ठिकाणी सहा सहा महिने अगोदरच बुकींग करावी लागत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top