नवीन बातम्या
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

मोहोपाडा रसायनी येथे सुपर स्पेशालिटी अष्टविनायक हॉस्पिटलचे लोकार्पण


सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मोहोपाडा रसायनी येथे सुपर स्पेशालिटी अष्टविनायक हॉस्पिटलचे लोकार्पण सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासांबे आणि माजी महिला बाल सभापती रायगड जिल्हा परिषद सौ. उमाताई संदीप मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यासाठी रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर बांगर सर ही उपस्तिथ होते.


18 वर्षांपासून अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलोनी, नविन पनवेल (पश्चिम) येथे सर्व सुविधांयुक्त सेवा देत आहे. हे हॉस्पिटल देशातील सर्वांत महत्वाचे मानांकन असलेला रायगड मधिल आणि नवी मुंबईतील पहिले संपूर्ण एन. ए .बी. एच. असलेले हॉस्पिटल आहे. त्यांची दुसरी शाखा मोहोपाडा येथे सुरु करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या दुमजली इमारतीत एकूण सध्या 50 खाटांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. भविष्यात 100 खाटांची उपलब्धता करून देण्याचा त्यांचा मानस आहे हृदय रोग निवारण साठी सुसज्ज कॅथ लॅब, 2 आधुनिक ऑपरेशन थिएटर, 1 प्रसूती गृह, 10 खाटांचे परिपूर्ण अतिदक्षता विभाग, 4 विभागून प्रशस्त वार्ड, 15 विशेष आणि अतिविशेष खोल्या, अतिदक्षता विभाग, डायलेसिस, पॅथॉलॉजी, फार्मसी, ऍम्ब्युलन्स इत्यादी सेवा उपलब्ध असल्याची माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय अधिकारी रुपेश यादव यांनी करून दिली.


या हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अक्षदीप अगरवाल आणि रुची अगरवाल यांनी या हॉस्पिटलमध्ये सर्वोतोपरी सेवा देण्याचे त्यांचे उद्दिष्ट्ये असल्याचे सांगितले. तसेच  या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, कँसर, पोटातील विकार, हाडांचे, सांध्यांचे  आणि पाठीच्या मणक्याचे आधुनिक पद्धतीचे ऑपरेशन्स तसेच मुतखडा, किडनीचे आजार, डायबिटीज, ब्लडप्रेशर आणि थायरॉईड मॅनेजमेंट, स्त्रियांचे आजार, गर्भधारणा आणि प्रसूती विभाग उपलब्ध असल्याचे सांगितले.


तसेच 24 तास आपत्कालीन व अपघातातील रुग्णांसाठी सेवा देणार असल्याचे ही कळविले.
तसेच डॉ. अगरवाल यांनी सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार असून त्याबरोब राज्य कामगार विमा, जीवनदायी योजना सुरु करणार असल्याचे ही सांगितले.
एकंदरीत संपूर्ण आजूबाजूचा परिसर, आणि आसपास असलेल्या गावातील लोकांसाठी आणि कंपनीतील अधिकारी व कामगारांच्या परिवारासाठी सर्व सोयीने परिपूर्ण असे हॉस्पिटल रसायनी येथे सुरु झाल्यामुळे अनेकांना पनवेल किंवा नवी मुंबई, मुंबई येथे आरोग्य सेवा अथवा आपत्कालीन परिस्थितीत जाण्याचे प्रमाण आता कमी होणार असल्याचे निदर्शनास येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top