दिनांक १ डिसेंबर २०२४
महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल भैया दुबाले यांच्या वाढदिवसानिमित्त अवघ्या महाराष्ट्र भर वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले होते.
याच धर्तीवर रायगड जिल्हा अध्यक्ष मा.श्री. किशोरजी वाजे यांच्या मार्गदर्शनानुसार आज *श्री. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित प्राथमिक माध्यमिक आदिवासी शाळा. वाकडी, पनवेल* येथे शाळेतील मुलांना बिस्किट वाटपाचा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमलेल्या सर्व मुलांनी एकदम अनोख्या पद्धतीने टाळ्यांचे वेगवेगळे प्रकार सादर करून पाहुण्याचे स्वागत केले आणि सर्वांची मने जिंकली.

यादरम्यान संघटनेचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री.प्रदीप चव्हाण* यांनी पोलिसांचे समाजातील महत्त्व उपस्थित मुलांना समजावून सांगितले.तसेच या कार्यक्रमाला खुद्द राहुल भैय्यानी व्हिडिओ कॉल द्वारे सर्वांशी संपर्क साधला या दरम्यान लहान मुलांनी राहुल भैया यांना वाढदिवसाच्या एक सुरात गाऊन शुभेच्छा दिल्या या प्रकारच्या प्रेमळ शुभेच्छा पाहून राहुल भैया खुद्द भारावून गेले.
शाळेचे पर्यवेक्षक शेख सर यांनी सर्व उपस्थित सर्व मंडळींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

सदर उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी
श्री. सिद्धेश्वर सुळे साहेब ( महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख )
श्री. मयूर राठोड ( रायगड जिल्हा मुख्य सचिव )
सौ . रश्मी चव्हाण ( रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख)
सौ. स्वप्नाली देसाई ( रायगड जिल्हा महिला संघटिका )
सौ. पूजा जाधव ( पनवेल तालुका महिला अध्यक्षा )
कु.विश्रांती पवार (पनवेल शहर महिला अध्यक्षा)
सौ. मंचिता मोरे ( पनवेल ग्रामीण विभाग संघटिका )
कु .करन पवार (पनवेल तालुका अध्यक्ष )
श्री. सुजित जाधव (उप संघटक – पनवेल तालुका)
श्री. शशिकांत चव्हाण ( पनवेल तालुका सचिव )
श्री. प्रसन्न पडवळ ( पनवेल उसर्ली शाखा उपाध्यक्ष )
सुमित सुळे ( संघटक रायगड जिल्हा विद्यार्थी आघाडी )
हर्ष पटेल ( उपसंघटक रायगड जिल्हा विद्यार्थी आघाडी )
श्याम खैरे ( सदस्य )
सानिया राजगुरू ( सदस्य )
प्रिया पटेल ( सदस्य )
यांचा महत्त्वपूर्ण हातभार लागला.
