नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि आमची तळमळ – लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १२) मोठ्या उत्साहात पार पडला. 


     या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, महाविद्यालयीन स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून यशस्वी झालेला विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  दातृत्व,  कर्तुत्व आणि मातृत्व या तीनही गोष्टींचा संगम असणारे व्यक्तिमत्व आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा,  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर हे होते. यावेळी त्यांनी  विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय  स्पर्धेत, महाविद्यालयीन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून या महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाही याची  दक्षता आम्ही घेऊ असे ते यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी आणखी वीस लाख रुपये देणगी जाहीर केली. गेल्या ४० वर्षात या ठिकाणी शिक्षणासाठी खूप अडचणी होत्या पण त्या या महाविद्यालयाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात भरून निघाल्या असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले. आजचे युग स्पर्धेचे आहे आणि या स्पर्धेत तळागाळीत दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे, ही आमची तळमळ असते त्यामुळे आपल्याकडून जेवढे करता येईल तेवढी मदत झाली पाहिजे हा उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठिकाणी गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांना मिळालेली बक्षिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे निश्चितच या महाविद्यालयाने शिक्षणासह इतर क्षेत्रातही वेगाने विकास केला असल्याचे गौरवोद्गारही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.


    व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे  यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विकासामध्ये आपली संस्था ही महत्त्वाचे कार्य करीत आहे. म्हणून पारंपरिक शिक्षणाबरोबरच आपण  तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर बदलत्या काळाबरोबर आपण बदललो पाहिजे ते मानवजातीच्या  विकासासाठी महत्त्वाचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता जिद्द ठेवून चिकाटीने अभ्यास करीत रहा. नक्कीच तुम्ही ठरवलेल्या  ध्येयापर्यंत पोहोचणार, असा सल्लाही शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या सोहळ्याची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य   डॉ. ए. एन चांदोरे यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील उल्लेखनीय  कार्य व विविध उपक्रमांची  माहिती दिली. महाविद्यालयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या वर्षीचा ‘लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कार’ सीनियर प्रा. एस. ई. सैंदनशिव तर महाविद्यालयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या वर्षीचा ‘ॲड.भगीरथ शिंदे पुरस्कार’ ज्युनिअर प्रा. एस. ए. फुंदे यांना प्रदान करण्यात आला. 


  या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन  व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.  टी. देशमुख, महाविद्यालय विकास समिती सदस्य कुणाल लाडे, महाविद्यालयाचे उपप्रचार्य  प्रा. एस. ई. सैंदशिव, उपप्राचार्य डॉ. एस. जी. मेंगाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. व्ही. एम. मोरे,  जिमखाना विभाग प्रमुख डॉ. एस. एच. जाधव, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एल.  डी. भोर, रयत शिक्षण  या संस्थेच्या आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी काकूळते सर, शेळके सर, काजळे सर, लंके सर, वाघमारे सर, हनीफ शेख, संदीप निकम, काशिनाथ कान्हव, फारुख पिंजारी, प्रशांत पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top