कोस्टल सेक्युरिटी हेल्पलाईन 1093 बाबत जनजागृतीसाठी मोटर सायकल रॅली



4kNews
पनवेल, दि. 13  (प्रतिनिधी):
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी कोस्टल सेक्युरिटी हेल्पलाईन क्रमांक 1093 बाबत जनजागृती करण्यासाठी मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही मोटर सायकल रॅली सकाळी 11.00 ते 12.10 या वेळेत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केळवणे जे.टी. ते केळवणे गाव, बस स्टॉप व शाळा परिसरात काढण्यात आली. रॅलीदरम्यान कोस्टल सेक्युरिटी हेल्पलाईन 1093 संदर्भातील बॅनर व पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. 



यावेळी उपस्थित सागर रक्षक व नागरिकांना सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. सागरी हद्दीत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ 1093 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कासारभट व केळवणे परिसरात पोलीस भेटी देत सतर्कता ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी दिली 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top