खून प्रकरणी आरोपी २४ तासांत गजाआड


4k News दि. 7
नवी मुंबई (प्रतिनिधी) : कळंबोली स्टील मार्केट परिसरात घडलेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी पनवेल गुन्हे शाखा कक्ष ३ ने अवघ्या २४ तासांत तपासाचा वेग वाढवत दोन आरोपींना गजाआड केले आहे. तांत्रिक तपास व गोपनीय पाळत यांचा प्रभावी वापर करून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.



मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद चांद शब्बीर शेख (वय २५) आणि जुएफ जमील इलियास शेख (वय २५) या दोघांवर संबंधित युवकाच्या खुनाचा संशय होता. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच इतर तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर गुन्हे शाखेने दोघांचा ठावठिकाणा शोधला.



गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने दोन्ही आरोपींना पनवेल परिसरातून ताब्यात घेऊन पुढील चौकशीअंती अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील तणावात दिलासा मिळाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top