नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे पनवेल मनपाला थेट आव्हान; पनवेल मनपा मतदार यादीतील १२,१४३ दुबार नावे हटवा

4kNews दि. 7

पनवेल दि.7(वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका (PMC) सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तोंडावर एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे! महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत थेट १२,१४३ दुबार आणि संशयित मतदारांची नावे घुसल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे. 


  सदर नावे जिल्ह्याबाहेरील, म्हणजेच नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील असल्यामुळे, आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त/प्राधिकृत अधिकारी (मतदार यादी) यांना तातडीने निवेदन देऊन या ‘महागोंधळा’वर कारवाईची मागणी केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक मतदारच असणे कायद्याने बंधनकारक असताना, पनवेल मनपाच्या यादीत नवी मुंबईतील मतदारांचा ढिग आढळला आहे. बेलापूर मतदारसंघ (विधानसभा १५१) ते पनवेल मनपा यादीत ६,१३८ दुबार/संशयित नावे तर ऐरोली मतदारसंघ (विधानसभा १९०) ते पनवेल मनपा यादीत ६,००५ दुबार/संशयित नावे असून या संशयित मतदारांची संख्या एकूण १२,१४३ इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विधानसभा मतदार याद्यांची प्रभाग निहाय फोड करून स्थानिक निवडणुकांची यादी तयार केली जाते.

मात्र,पनवेल मनपाच्या यादीत जिल्ह्याबाहेरील मतदार घुसल्याने मतदानाच्या वैधतेवरच थेट आक्षेप घेण्यात आला आहे. प्रारूप यादीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबर २०२५ होती.यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळली होती, पण त्यावेळी कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे यंदा याच ‘बोगस’ मतदारांच्या जीवावर निवडणुकीचे निकाल फिरवले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शिरीष घरत यांनी मागणी केली आहे की, या १२,१४३ दुबार मतदारांची कठोर शाहनिशा करावी आणि अंतिम यादीत त्यांच्या नावांसमोर विशिष्ट चिन्हांकन करावे. तसेच, मतदाराचे मतदान एकाच केंद्रात होण्यासाठी नियोजन करण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे. जर या त्रुटी वेळीच सुधारल्या नाहीत, तर संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि निकालावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top