नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते ‘दिबां’चेच नाव मिळणार
– लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ठाम विश्वास


4k समाचार दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे प्रतिपादन सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. 

   एका मुलाखतीदरम्यान बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कृती समितीच्या बैठकीत सर्वांसमोर या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. येत्या तीन महिन्यांच्या आत विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव लागलेले आपण पाहू. ते पुढे म्हणाले, आज जे विरोधक या दि.बा.च्या नावा संदर्भात शंका उपस्थित करत आहेत, त्यांनी पूर्वी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाबाबत काय भूमिका घेतली होती, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांचा उथळपणा स्पष्ट दिसतो आणि उथळ पाण्याला नेहमी खळखळाट जास्त असतो. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, आपल्या देशातील मोदी सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकार आपल्या शब्दाचे पालन करणारे आहेत. निश्चितच विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव लागेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top