पनवेल दि.१७ (वार्ताहर) : नवी मुंबईतील घणसोली येथील स्थायिक असलेले आणि शासकीय आदीवासी आश्रम शाळा चिंबीपाडा येथे स्त्री अधिक्षिका या पदावर कार्यरत असलेल्या माधुरी लोखंडे शासकीय नोकरी मध्ये रुजू झाल्यापासून आपला वाढदिवस या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थीनी सोबत साजरा करून आपला वाढदिवसाचा आनंद या विद्यार्थ्यांसोबत सहभागी होऊन साजरा करीत आहे.

सामाजिक भान ठेवून आपल्याला आनंद कसा निर्माण करता येईल, आणि समाजामध्ये आपण आधुनिक शहरामध्ये स्थायिक झालो असलो, तरीही काही दुर्गम ग्रामीण भागमध्ये अजूनही आपले आयुष्य जगणे या पलीकडे काहीही माहीत नाही, तर नवी मुंबईमध्ये घणसोली येथे स्थायिक असलेल्या अधिक्षिका पदावर कार्यरत माधुरी लोखंडे यांनी समाजाप्रती आपले काही देणं आहे, या भावनेने शासकीय आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चिंबीपाडा तालुका भिवंडी येथील इयता पहिली ते दहावी शिकत असलेल्या 130 आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत आपला जन्मदिन साजरा करीत विद्यार्थ्यांना केक आणि खाऊ वाटप करून वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यावेळी इयत्ता दहावी विध्यर्थिनीं भावुक होऊन त्यांचे शेवटचे वर्ष असून परीक्षा सुद्धा जवळ आली, असल्याने अश्रू अनावर झाले होते, मात्र तुमचे जरी या शाळेतील शेवटचे वर्ष असले तरी मी येथेच राहणार असून तुम्ही यापूढे चांगले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे आपले आयुष्य उज्ज्वल करीत मला भेटायला या, तेच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल, आणि मला त्याचा अभिमान असेल असे माधुरी लोखंडे यांनी विध्यर्थिनींना समजूत देऊन प्रोत्साहन यावेळी दिले.

यावेळी अधीक्षक महादेव भंडारी, शिक्षक शिवाजी केने आणि सोनू पागी सर, कर्मचारी रवींद्र पवार परिवार सह उपस्थित होते. चिंबीपाडा हे गाव तालुका भिवंडी, ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास आहे, तर त्या गावातील परिसरातील आदिवासी वाडी, पाडा, आजूबाजूचे गावातील पालक उदरनिर्वाह साठी इतरत्र कामासाठी जातात, तर त्याच्या मुलांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून शासनाने आदिवासी विभाग मार्फत निवासी आश्रमशाळा सुरु केल्या आहेत, तर तेथे आदिवासी समाज आपल्या मुलांना तेथे शिक्षणासाठी दाखल करतात, आणि शिक्षण पूर्ण करतात, त्यामुळे आपण शहरात स्थानिक झालो असलो, तरी आपला जन्मदिन वाढदिवस विद्यार्थी विध्यर्थिनी सह साजरा करून त्यांना झालेल्या आनंदात स्वतः आनंद मिळत असल्याचे मनोगत माधुरी लोखंडे यांनी व्यक्त केले.
