पनवेल दि.१७ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दोन वाहनांचा अपघात होऊन यामध्ये टेम्पोचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पनवेल बाजूकडून पेण बाजूकडे खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पो जात असताना त्याला औषध पोहोचवणे टेम्पो याने त्याला मागून धडक दिली. यामध्ये खाद्यपदार्थाने भरलेला टेम्पोमधील चालक जखमी झाला आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
