नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

घरकाम करणाऱ्या नोकराने ४२ लाख ६० हजार किमतीचे दागिने पळविले; खारघर पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक


पनवेल दि.१७ 4k News (संजय कदम): खारघर येथील घरकाम करणाऱ्या नोकराने घरातुन रू. ४२,६०,०००/- किमंतीचे सोन्यावे व चांदीचे व डायंमडचे दागिने, रोख रक्कमेसह पळुन गेलेल्या नोकरास खारघर पोलीस ठाण्याचे पथकाने शिताफिने जालौर, राजस्थान येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील १००% मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. 


   खारघर पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी त्यांचे घरात काम करणारा दौलत शैतान सिंग (वय २५) याने त्यांचे घरातील ४२,६०,०००/- रूपये रकमेचे सोन्याचे, चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम अशी चोरी करून पळुन गेल्याबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद दाखल गुन्हयाचे तपासकामी खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक सुरज पाटील, (गुन्हे),  पोलीस उप निरीक्षक सुरज जाधव, पोहवा सुरेश कासार, पोना मच्छिद्र खेडकर, पोशि अविनाश मोरे, सीडीआर एसडीआर विश्लेषक पोहवा वैभव शिंदे यांचे पथक तयार करून आरोपीचे राहत्या पत्तावर पाठविण्यात आले होते. नमुद पथकाने आरोपीच्या राहत्या पत्तावर सिरोही राजस्थान येथे पाळत ठेवली होती. पंरतु आरोपी हा त्याचे लोकेशन बदलुन वावरत होता.

आरोपीचे लोकेशन हे हिमाचल येथे आल्याने त्यास पकडण्याकामी दुसरे पथक रवाना करण्यात आले होते. आरोपीचे लोकेशन जालौर, राजस्थान येथे आल्याने नमुद पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली असुन गुन्हयातील चोरी केलेला रूपये ४२,६०,०००/- रूपये रकमेचे सोन्याचे, चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम असा मुद्देमालासह त्यास पुढील कारवाईकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top