नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन

4kNews कामोठे दि. 6

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच्या शास्त्रीय संगीतावरील मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक कार्यक्रमाला पनवेल तालुक्यासह परिसरातील युवा व ज्येष्ठ कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शास्त्रीय संगीताच्या विविध पैलूंचे सखोल विवेचन आणि प्रत्यक्ष सादरीकरणामुळे हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि सुरेल अनुभव ठरला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विदुषी शुभदा पराडकर यांचा सन्मान करण्यात आला.



पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शास्त्रीय गायिका विदुषी सौ. शुभदा पराडकर, ह.भ.प. पं. निवृत्तीबुवा चौधरी, ह.भ.प. पं. महादेवबुवा शहाबाजकर, वसंतशेठ पाटील, जे. टी. पाटील, पं. उमेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, युवा व ज्येष्ठ कलाकार उपस्थित होते. 



विदुषी शुभदा पराडकर यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, रागदारी संगीत, विविध सांगीतिक घराणी, स्वरलगाव, रियाज, ताना, तोडे तसेच गायकीतील विविध बारकावे यावर अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल मार्गदर्शन केले. आपल्या प्रात्यक्षिक सादरीकरणातून त्यांनी संगीताच्या तांत्रिक अंगासोबतच संगीत साधनेकडे पाहण्याची दृष्टी आणि सातत्यपूर्ण रियाजाचे महत्त्वही अधोरेखित केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित कलाकारांना शास्त्रीय संगीताच्या साधनेची नवी दिशा मिळाली.कार्यक्रमादरम्यान युवा कलाकारांसह ज्येष्ठ व अनुभवी कलाकारांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. विदुषी शुभदा पराडकर यांनी या प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देत संवाद साधला. त्यामुळे मार्गदर्शनपर सत्र अधिकच ज्ञानसमृद्ध, संवादात्मक आणि प्रेरणादायी ठरले. उपस्थित कलाकारांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.यावेळी उपस्थित युवा कलाकारांनी पनवेल तालुक्यात अशा प्रकारचे शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शनपर व प्रात्यक्षिक कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि पं. उमेश चौधरी यांनी पुढाकार घेऊन असे उपक्रम नियमितपणे राबविल्यास नवोदित कलाकारांना शास्त्रीय संगीताचे योग्य मार्गदर्शन, संस्कार आणि व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.



यावेळी ज्येष्ठ कलाकारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सांस्कृतिक योगदानाचे विशेष कौतुक केले. भारतीय शास्त्रीय संगीत, कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ते तळमळीने कार्यरत असल्याचे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले. आमदार प्रशांत ठाकूर यांना निरोगी, यशस्वी आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याला भविष्यातही अधिक बळ मिळावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक कार्यक्रमामुळे पनवेल परिसरातील शास्त्रीय संगीतप्रेमी आणि युवा कलाकारांना नवी प्रेरणा, नवी दिशा आणि संगीत साधनेसाठी नवा उत्साह मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र पाटील यांनी समर्पक व प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समिती सदस्य विनोद तोडेकर, कृष्णा पवार, नारायण पाटील, जगदीश पाटील आणि सौ. पूनम ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन व समन्वयामुळे हा मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top