नवीन बातम्या
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.



4k समाचार
उरण दि २30 (विठ्ठल ममताबादे )गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना पक्ष रात्रं दिवस कार्यरत असून पक्षाने गोरगरिबांना मोठया प्रमाणात आधार दिला आहे. शिवसेनेचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोक कल्याण कारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जन माणसात शिवसेनेची प्रतिमा उंचावली आहे. शिवसेनेप्रती लोकांचा आदर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. अनेक जण मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश देखील करत आहेत. 

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेवून उरण मधील तरुणांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.मावळचे लाडके खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पनवेल मधील जनसंपर्क कार्यालयात उरण विधानसभेतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.रोहित बाळासाहेब मस्के
राहणार नागाव म्हातवली,प्रणय प्रमोद वाघमारे   


राहणार द्रोणागिरी,मयूर दत्ता पाटील राहणार द्रोणागिरी,गणेश महादेव भिरजदार 
राहणार केगाव,अनिल निमंग्रे
राहणार मुळेखंड यांनी नुकताच शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे तसेच उरण तालूका प्रमुख दिपक ठाकूर, उरण तालूका ग्राहक संरक्षण कक्ष वीरू चाळके,भावेश भोईर व उपशाखाप्रमुख उपस्थित होते.तरुण वर्ग मोठया प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत असून यामुळे शिवसेना पक्ष अधिक मजबूत, व्यापक होण्यास मदत होत आहे. पक्ष प्रवेश मुळे संघटना व पक्षाचे आचार विचार तळागाळात पोहोचण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top