पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः नवीन पनवेल भावाला मारहाण केल्याची विचारणा केली असता चौघांनी मोबाइल, दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी मनीष तिवारी, तुषार तिवारी, आरती तिवारी, जगदीश तिवारी यांच्या विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

साईनाथ शिंदे याचा सेंट जोसेफ शाळा, सेक्टर चार, कळंबोली येथे वाद झाला. या वेळी साक्षी आणि श्रावणी या तेथे गेल्या. या वेळी त्यांचा भाऊ साईनाथ याला त्यांनी विचारले असता जगदीश तिवारी याचा दुसर्या मुलासोबत वाद सुरू होता तो सोडवण्यासाठी साईनाथ गेला असता जगदीशसह त्याचे वडील मनीष, चुलते तुषार आणि आई आरती यांनी त्याला मारहाण केली. शिवीगाळ करू नका, असे साक्षीने सांगितले असता मनीषने तिचा मोबाइल खेचून डोक्यात मारला. त्यानंतर दगड उचलून डोक्यात मारला.
