वाशीतील संडे बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या ठिकाणी महिला वेटर ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, वाशी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, बेकायदेशीरने डान्सबार चालवला जात असल्याचे तसेच अश्लील हावभाव करून नृत्य सादर करत असल्याचे दिसून आले. त्यावरून बारवर कारवाई करून संबंधितांवर वाशी पोलिसांनी गन्हा दाखल केला आहे.
