पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक थंब पध्दत कर्मचार्यांना अनिवार्य असताना पनवेल तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना या पध्दती मधून वगळण्यात आले आहे का? याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची खुलासा करण्याची शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी म्हटले आहे की, कर्मचारी हे ( सेल्फ गर्व्हर्निंग) ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, याचा खुलासा होणे प्रथमतः आवश्यक आहे, तसेच तहसीलदार वगळता इतर सर्व कर्मचारी वर्ग 2 व 3 मध्ये अंतर्भूत होतात त्यामुळे शासकीय नियमानुसार कार्यालयात हजेरी लावण्यासाठी किती वाजता हजर राहावे व किती वाजता कार्यालय सोडावे याबाबत बायोमेट्रिक थंब पध्दत ही कर्मचार्यांना अनिवार्य आहे या सर्व कारणास्तव शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक थंब पध्दतीचा इथंबुत विचार करून पुढील कारवाई दिलेल्या तक्रार वजा पत्रकानुसार होण्याची मागणी त्यांनी केली आहे.
